कोकण

रत्नागिरी एकात्मिक पॅक-हाऊस आणि शीतगृह प्रकल्प

CD

रत्नागिरी एकात्मिक पॅक-हाऊस आणि शीतगृह प्रकल्प
रत्नागिरी, ता. १० : महाप्रीत आणि कोकण रेल्वे यांच्यावतीने रत्नागिरी येथे २००० टन क्षमतेचा निर्याताभिमुख कृषि उत्पादनपूरक शीतगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २५ कोटी आहे. शीतगृहामध्ये कोकणात उत्पादित होणाऱ्या सुप्रसिद्ध हापूस आंब्याची तसेच इतर नाशवंत शेतीमालाची दीर्घ काळासाठी साठवणूक करणे तसेच परदेशात निर्यात करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
शीतगृहात मँगो पल्प दीर्घ काळासाठी साठवणूक करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध होणार आहे. आंबा, आंबा-गर तसेच इतर भाजीपाला व फळे ही नाशवंत असल्यामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडतो. शीतगृहामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा नाशवंत शेतीमाल शास्त्रशुद्ध पद्धतीने दीर्घकाळ साठवणूक करून त्यांना योग्य तो हमीभाव मिळविण्यास मदत होईल. त्यामुळे पर्यायाने कोकणातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होईल. तसेच कोकण विभागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्याने उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गेली अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्याला आता मूर्तस्वरूप आले आहे. यामुळे रत्नागिरी हापूससह अन्य नाशवंत शेतमालेच नुकसान टाळणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: इराण अमेरिकेची नांगी ठेचणार? प्लॅन B काय? आता जगालाही हादरा बसणार! १८ कंपन्यांना धमकीमागची खरी स्टोरी काय?

पाच दिवसांत आरोपपत्र अन् १६ दिवशी थेट निकाल! सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Ready Reckoner Rates: महायुती सरकारने रेडी रेकनर स्थिर ठेवण्याचा निर्णय का घेतला? उत्तर आलं समोर...

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

Ichalkaranji gas fire : इचलकरंजीत नॅचरल गॅस पाईप्सच्या साठ्याला आग, १० किमीपर्यंत धुराचे लोट

SCROLL FOR NEXT