कोकण

नवोदयमधील विषबाधा झालेल्या वीसपैकी १७ मुलांना डिस्चार्ज

CD

नवोदयमधील विषबाधा झालेल्या
वीसपैकी १७ मुलांना डिस्चार्ज

तिघांवर उपचार, चौकशीसाठी उपायुक्त सांगेलीत

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः सांगेली जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वीस पैकी सतरा मुलांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले. केवळ तीन मुलांवर आता रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिंशा महिजन यांनी दिली.
दरम्यान, आज सांगेली नवोदय विद्यालयात केंद्रीय नवोदय विद्यालय समितीच्या पुणे विभागीय कार्यालयातील उपायुक्त माधुरी उदयशंकर चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. सलग तीन दिवस या संपूर्ण घटनेची चौकशी करुन झाल्यानंतर ते आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत. आज दिवसभरात विद्यालयातील उर्वरीत मुलांना साधारण लक्षणे आढळून आली. त्यांच्यावर तातडीने आरोग्य केंद्रातील डॉक्टर व टीम पाठवून प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. उपायुक्त उदयशंकर या घटनेची चौकशीसाठी आज विद्यालयात दाखल झाल्या असून त्यांनी विद्यालयातील प्राचार्य, संपूर्ण स्टाफ, कर्मचारी, मेस कर्मचारी, मेस ठेकेदार यांची बैठक घेतली. दिवसभर या प्रकरणाची चौकशी सुरु होती. यामध्ये जेवणासाठी वापरण्यात आलेले बटाटे खराब झाले होते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. तरीही पुढील दोन दिवस ही चौकशी सुरु राहणार असून याचा संपूर्ण अहवाल पुणे विभागिय आयुक्त यांना सादर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT