कोकण

भरधाव मोटारीच्या धडकेत परुळेतील युवक जागीच ठार

CD

70397
पांडुरंग हडकर

भरधाव मोटारीच्या धडकेत
परुळेतील युवक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
म्हापण,ता.१० ः ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव मोटारीच्या धडकेत परुळे आजारवाडी येथील युवक जागीच ठार झाला. पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर, असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. घटनास्थळाहून पळ काढणाऱ्या चालकाला स्थानिकांनी पाट येथे रोखले. घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परुळे आजारवाडी येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर हे सागरी महामार्गवर रस्त्याकडेला उभे होते. त्याचवेळी कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीने ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर याला जोराची धडक दिली. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मोटार चालक तेथे न थांबता निघून जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पाट येथे अडवले. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत मोटार चालकास अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चालकास पोलिसांनी अटक केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. सागरी महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात वाहन चालक अतिशय वेगाने वाहन चालवताना दिसून येतात. मुळात या मार्गाच्या आसपास वस्ती असल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पांडुरंग यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे वडिल, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे. पांडुरंग यांना शेतीची आवड होती. कष्ट करून भुईमूग लागवड केली आहे. वडिल आजारी असतात. एक भाऊ मुंबई येथे नोकरी करतो. पांडुरंग यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे ते एकांकिका स्पर्धा, नाटकामध्ये सहभाग घेत असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT