Katal Shilp Konkan esakal
कोकण

Katal Shilp Konkan : कोकणातील मुणगे सड्यावर सापडली मानवाकृती कातळशिल्पे; इतिहास संशोधन मंडळाची पाहणी

मुणगे आडबंदर (Munge Aadbandar) येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे (Carving) सापडली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तालुक्यात आजवर शंभरहून अधिक कातळचित्रे सापडली आहेत; परंतु तालुक्याच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती.

देवगड : तालुक्यातील मुणगे आडबंदर (Munge Aadbandar) येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे (Carving) सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने (Devgad History Research Board) त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.

या दोन आकृत्यांमध्ये दगड, मातीचा मोठा ढीग पडलेला होता. त्यामुळे ह्या चित्रांचे नेमके आकलन काही होत नव्हते. तेथील दगड माती उचलून बारकाईने सर्वच साफसफाई केल्यानंतर या कातळचित्रांची आकृती स्पष्टपणे दिसू लागली. या कातळ चित्रांविषयी हिर्लेकर म्हणाले, ‘‘या दोन उलटसुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी मध्यरेषा काढली, तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्‍चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळजवळ काढलेली नसावीत, असे दिसते.

डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा कोरलेल्या दिसतात.’’ श्री. टाककर यांनी या परिसरात आणखीही काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता आहे, असे सांगून आपल्या भागातील कातळचित्रांविषयी लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

तालुक्यात आजवर शंभरहून अधिक कातळचित्रे सापडली आहेत; परंतु तालुक्याच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती. या कातळचित्रांविषयी एक विलक्षण कथा या भागात ऐकायला मिळाली. गावातील लोक या आकृत्यांना ‘मामा-भाचे’ असे म्हणतात. ही कातळचित्रे पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. भविष्यात स्थानिक पर्यटन रोजगार यामुळे वाढून त्याचा मोठा आर्थिक लाभ स्थानिकांना होईल.

-रणजित हिर्लेकर, प्राच्यविद्या अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT