कोकण

लांजा-कुरंगमधील नावेरी नदीवर कमानी पूल

CD

rat2p26.jpg
74796
लांजाः नावेरी नदीवर बांधण्यात येत असलेला पूल.
----------
कुरंगमधील नावेरी नदीवर कमानी पूल
वाहतुकीचा प्रश्न सुटणार; ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार, अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास
लांजा, ता. २ः तालुक्यात प्रथमच कुरंग येथील नावेरी नदीवर नावीन्यपूर्ण असा कमानी पूल साकारला जात आहे. या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. कमानी पद्धतीचा (Arch Type) पूल आहे. त्याचे ड्रॉइंग मॉडर्न आर्च इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने बनवले आहे. या पुलाला दोन गाळे असून, पावसाच्या पाण्याने वाहतुकीस काहीही अडचण येणार नाही, असा आराखडा तयार केला आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुरंग गावात पावसाळ्यात येथील वरचीवाडी, कदमवाडी आदी वाडीवस्तीचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांची पुरामुळे मोठी गैरसोय होते. येथील ग्रामस्थांची येथे पूल उभारणीची अनेक वर्षांची मागणी होती. ही मागणी आता पूर्णत्वास जात आहे. आर्च कमानी पद्धतीचा पूल येथे बांधण्यात येणार आहे. पुलाची लांबी ३० मीटर आणि उंची ४.३ मीटर आहे. या पुलासाठी १ कोटी ११ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. पुलामुळे कुरंग गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात वाहतुकीची अडचण येणार नाही. बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुलाची मागणी पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या पद्धतीचा पूल रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच बांधण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नावेरी नदीच्या दोन्ही बाजूला कुरंग गावाची वस्ती आहे. आरोग्य केंद्र असल्याने पावसाळ्यात तर वाहतुकीची मोठी अडचण होते. या नदीवर साकव होता. साकवावरून ये-जा करणे धोकादायक होते. पुलाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. पुलाखालून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दोन गाळे असल्याने अतिवृष्टीमुळे या पुलाला पाण्याचा धोका होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT