कोकण

''स्वीप'' अंतर्गत दापोलीत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

CD

२९ (टुडे ३ साठी)

''स्वीप'' अंतर्गत दापोलीत स्पर्धा

अण्णासाहेब बळवंतराव ; मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ४ ः लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ''स्वीप'' अंतर्गत दापोली तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ''स्वीप''चे नोडल ऑफिसर तथा दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दिली.
''स्वीप'' उपक्रमांतर्गत १ एप्रिलला सर्व शाळांमधून प्रभातफेरीचे आयोजन केले होते. मतदार जागृती करणारी घोषवाक्ये, पथनाट्य, गीतगायन आदी कार्यक्रमांचा समावेश फेरीत होता. या मतदारजागृती उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. पहिली ते पाचवी व सहावी ते बारावी अशा दोन गटांत ही स्पर्धा होत आहे. ८ एप्रिलला पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून, मतदानाचा हक्क, मतदानाचे महत्व, मतदान माझा अधिकार आणि लोकशाही आदी विषयांवर निबंधलेखन करायचे आहे. १२ एप्रिलला १ ली ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र तसेच १४ एप्रिलला मतदार जागृतीबाबत घोषवाक्य स्पर्धा केली आहे. या सर्व स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब बळवंतराव यांनी केले आहे. या स्पर्धांबरोबरच पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग निर्मित मतदारजागृती अभियान कलापथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक दापोली तालुक्यात ठिकठिकाणी मतदार जागृतीपर समूहगीत गायन, पोवाडा, पथनाट्य आदींच्या माध्यमातून मतदार जागृती करणार आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT