कोकण

शिष्यवृत्ती परीक्षेत अमिषा पाटीलचे यश

CD

शिष्यवृत्ती परीक्षेत
अमिषा पाटीलचे यश
मालवणः ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची सहावीची विद्यार्थिनी अमिषा पाटील हिने सुवर्णपदक पटकावले. अमिषा ही टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचे निवृत्त अधिव्याख्याता एम. जी. पाटील यांच्या कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल जय गणेश इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. या परीक्षेसाठी तिला पल्लवी चोपडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
............
रेडिरेकनरचे दर
यावर्षी ''जैसे थे''
सावंतवाडीः रेडिरेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. क्रेडाईच्या महाराष्ट्रातील ६६ शहरांच्या सर्व ३५०० सभासदांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाने नागरिकांनी केलेल्या विनंतीवजा मागणीची दखल घेतली. त्यानुसार शासनाने रेडिरेकनरचे दर २०२४-२५ वर्षासाठी न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. योग्य पद्धतीने प्रगतीपथावर असलेला बांधकाम व्यवसायामुळे अधिक प्रगती करून शासनाच्या तिजोरीत नक्कीच जास्त भर घालणार आहे. गेल्या वर्षीचा ५० हजार कोटीचा वाढीव उद्दिष्ट दर न वाढविणे त्यामुळेच शक्य झाले आहे.
.............
आरोस येथे ९ पासून
दशावतार नाट्योत्सव
सावंतवाडीः आरोस येथील देव गिरोबा युवक नाट्यमंडळातर्फे ९ ते १८ एप्रिल या कालावधीत रामनवमीनिमित्त देव गिरोबा रंगमंच, गिरोबावाडी येथे कीर्तन व दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. ९) तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ, झारापचा ''पुण्यप्रभाव,'' बुधवारी (ता. १०) मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, मोरेचा ''दीप माझ्या वंशाचा'', गुरुवारी (ता. ११) चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवणचा ''भक्तिमहिमा'', शुक्रवारी (ता. १२) देवी भूमिका दशावतार नाट्यमंडळ, मळगावचा ''दुष्यंत शकुंतला'', शनिवारी (ता. १३) वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोलीचा ''अघोर लक्ष्मी'', रविवारी (ता. १४) जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोसचा ''रात्रीस खेळ चाले'', सोमवारी (ता. १५) दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ''मीनाक्षी सुंदरेश्वर'' नाट्यप्रयोग होणार आहे. हे नाट्यप्रयोग रोज रात्री ९.३० वाजता सुरू होतील. १७ ला दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा, रात्री ९.३० वाजता देव गिरोबा युवक नाट्यमंडळ प्रस्तुत, वि. वा. शिरवाडकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक नाटक ''नटसम्राट'' होणार आहे. १८ ला रात्री ९.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुरचा ट्रिकसिनयुक्त नाटक ''काली कंकाली''नाट्यप्रयोग होणार आहे.
..............
न्हावेलीत रविवारी
काव्यवाचन कार्यक्रम
सावंतवाडीः न्हावेली येथील शब्दसखा ग्रुप यांच्यावतीने रविवारी (ता. ७) सकाळी १० वाजता तेथील मोर्ये सर सद्गुरू हॉल येथे प्रसिद्ध कवयित्री (गोवा) डॉ. अनुजा जोशी, कविवर्य शंकर रामाणी, प्रसिद्ध निवेदक (गोवा) गोविंद भगत यांचा काव्यवाचन, निरुपण व काव्यगायन कार्यक्रम होणार आहे.
..............
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक
असोसिएशनची आज सभा
ओरोसः सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन शाखा मालवणच्या कार्यकारिणीची सभा उद्या (ता. ५) सकाळी १० वाजता तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्कूल मालवण येथे आयोजित केली आहे. या सभेत १६ एप्रिलला घेण्यात येणाऱ्या स्नेहमेळाव्याचे नियोजन व निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यकारिणी सदस्य व हितचिंतक सदस्यांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस आनंद धुत्रे यांनी केले आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT