कोकण

कुडाळात ''कुडाळ श्री'' शरीरसौष्ठव स्पर्धा

CD

कुडाळात ‘कुडाळ श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा
उद्या आयोजनः ‘गिअर अप’ पिंगुळी, ‘शिवप्रतिष्ठान’चे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः गिअर अप पिंगुळी आणि शिवप्रतिष्ठान कुडाळ यांच्यावतीने यावर्षी प्रथमच लाखोंची पारितोषिके असणाऱ्या जिल्हास्तरीय ‘कुडाळ श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा २०२४ चे आयोजन शनिवारी (ता. ६) सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत येथील अनंत मुक्ताई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजिक केले आहे. या स्पर्धेला मि. वर्ल्ड, मि. एशिया, मि. इंडिया, महाराष्ट्र श्री किताबप्राप्त महेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. जिल्ह्यातील ५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, अशी माहिती गिअर अप पिंगुळीचे संचालक साईराज जाधव व शिवप्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर आळवे यांनी दिली.
पिंगुळी येथील ''गिअर अप'' दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने यावर्षी प्रथमच ''कुडाळ श्री'' ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे उद्धाटन शनिवारी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. संग्राम देसाई, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक मुंबई आदी उपस्थित राहाणार आहे.
ही स्पर्धा ५० ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० आणि ७० ते ७५ या वजनी गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे २० हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये ही मुख्य बक्षिसे, ट्रॉफी तसेच प्रत्येक ग्रुपला २ हजार, दीड हजार व १ हजार रुपयांची मेडल सर्टिफिकेट व शेकर देण्यात येणार आहे. मेन पिझिकसाठी १० हजार, ५ हजार, ३ हजार अशी मिळून लाखोंची पारितोषिके आहेत. सर्वांनी ''कुडाळ श्री'' स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईराज जाधव, ज्ञानेश्वर आळवे, विशाल कदम, विनायक पिंगुळकर, विपुल कराळकर, श्री. ऋषिकेश यांनी केले आहे.

चौकट
''सुदृढ शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा''
आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना प्रत्येकाच्या जीवनात धावपळ आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी व्यायाम करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने व्यायाम करून आपले आरोग्य सुस्थितीत ठेवावे, या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे गिअर अपचे संचालक साईराज जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT