कोकण

-घरकूल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

CD

६ (टुडे पान १ साठी)


-rat४p१६.jpg-
२४M७५२१६
गुहागर ः कोतळूकमधील निराधार महिलेने बांधलेले घरकूल.
-------------
‘घरकूल’च्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

कोतळूकमधील महिला झिजवतेय उंबरठे; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ ः तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले यांना घरकूल योजनेतून घर मंजूर झाल्याचे पत्र ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले. घरकूल मंजुरीनंतरचा पहिला हप्ता १५ हजार रुपये त्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी घराचे काम सुरू केले. जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता ४५ हजार रुपये मिळेल, या आशेने त्यांनी जोत्याचे बांधकाम पूर्ण केले. अनेकदा सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना भेटून दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी केली; मात्र अद्याप त्यांना तो मिळालेला नाही. अखेर या निराधार महिलेने दुसरे राहते घर नसल्याने दुसऱ्याकडून उसने पैसे घेऊन घराचे बहुतांश काम पूर्ण केले. दुसऱ्या हप्त्यासाठी गेला महिनाभर ग्रामपंचायत व पंचायत समितीचे उंबरठे ते झिजवत आहेत.
ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी आवास योजना सुरू झाली. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूरही झाले. त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिला हप्ता १५ हजार रुपये मिळाला; मात्र दुसऱ्या हप्त्याची घरकूलधारकांना अजूनही प्रतीक्षाच असून, ही योजना म्हणजे लोकांना गाजर दाखवणे अशी स्थिती दिसून येत आहे. यावर्षी २०२३-२४ या वर्षात तालुक्यात ६१५ घरांना मंजुरी देण्यात आली. त्यातील ६०६ घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यातील ९ घरांना तांत्रिक कारणास्तव पहिला हप्ता देण्यात आला नाही. तालुक्यात २८ अपंग तर ५८७ ओबीसींसाठी घरकुलांचे प्रस्ताव मंजूर आहेत. मार्चअखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत; मात्र मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वच लाभार्थ्यांना घरघर लागली आहे. गुहागर पंचायत समितीकडून दुसऱ्या हप्त्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता; मात्र पुढील सूचना येईपर्यंत हप्ता सोडू नये, असा मेसेज वरिष्ठांकडून देण्यात आला, अशी माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
---------
चौकट
घरकुलासाठी चार टप्प्यात रक्कम

या योजनेतून होणाऱ्या घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एकूण १ लाख २० हजार मंजूर आहेत. यापैकी पहिला हप्ता १५ हजाराचा असतो. दुसरा हप्ता ४५ हजार रुपये जोत्याचे काम पूर्ण झाल्यावर, तिसरा हप्ता लेवल पूर्ण झाल्यानंतर ४० हजार रुपये, चौथा हप्ता शौचालयासह घरकूल पूर्ण झाल्यानंतर २० हजार रुपये मिळतात.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT