कोकण

सिंधुदुर्गासाठी १८,५६७ मेट्रिक टन खताची मागणी

CD

सिंधुदुर्गासाठी १८,५६७ टन खताची मागणी
खरीप हंगामासाठी नियोजनः कृषि विभागाची माहिती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत खरीप हंगामसाठी एकूण १८ हजार ५६७ मेट्रिक टन एवढ्या खताची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी जानबा झगडे यांनी आज दिली.
जिल्हा परिषद कृषि विभागा मार्फत खरीप हंगामासाठी खताचा तुटवडा भासू नये, शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध व्हावे, यासाठी विविध खत कंपन्यांकडे आवश्यक असलेल्या खताची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण १८,५६७ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. ख़त वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एप्रिल अखेरपर्यंत ख़त उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी भरघोस पिकासाठी सेंद्रिय (दर्जेदार) खतांचा वापर करावा. बोगस ख़त विक्रीपासून सावध रहावे, असे आवाहन श्री. झगडे यांनी केले आहे. लवकरच विविध प्रकारची संकरित व सुधारित भात बियाण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली असल्याची माहिती यावेळी श्री. झगडे यांनी दिली.
-------------------
चौकट
मागणी केलेले खत
खत*मात्रा (मेट्रीक टनमध्ये)
यूरिया*७५०७
डीएपी*१०४९
एमओपी*९७०
सिंगल सुपर फॉस्फेट*२०१५
१०:२६:२६*४४५
१५:१५:१५*३६२६
१६:१६:१६*३६
१९:१९:१९*२८२९
२०:२०:०*१७
२०:२०:०:१३*१७
२४:२४:०*५८
एकूण*१८, ५६७
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT