कोकण

रामेश्‍वर-घरीवाडी येथे २६ हजाराची दारू जप्त

CD

रामेश्‍वर-घरीवाडी येथे
२६ हजाराची दारू जप्त
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ः तालुक्यातील रामेश्‍वर घरीवाडी परिसरात सुमारे २६ हजार ५०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली. विजयदुर्ग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका संशयिताविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तालुक्यातील रामेश्‍वर घरीवाडी परिसरात अवैध गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार विजयदुर्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून सुमारे २६ हजार ५०० रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडली. यामध्ये विविध प्रकारातील बाटल्यांचा समावेश होता. यामध्ये सुमारे १५०० रुपये किंमतीच्या १८० मिली मापाच्या १५ बाटल्या, सुमारे १००० रुपये किंमतीच्या १८० मिली मापाच्या पाच बाटल्या, सुमारे ४८०० रुपये किंमतीच्या ७५० मिली मापाच्या ६ बाटल्या तसेच सुमारे १९,२०० रुपये किंमतीच्या १८० मिली मापाच्या ९६ बाटल्या अशी एकूण २६ हजार ५०० रुपयांची दारू पकडण्यात आली. पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोनवळकर, पोलिस हवालदार प्रशांत जाधव, पोलिस हवालदार गणेश भोवड, पोलिस शिपाई संभाजी कांडर आंदीचा समावेश होता. अधिक तपास विजयदुर्ग पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT