कोकण

मॉरिशसमधील सांस्कृतिक कार्यक्रमांची रत्नागिरीकरांना पर्वणी

CD

४३ (पान ४ साठी)

मॉरिशसमधील सांस्कृतिक कार्यक्रमांची रत्नागिरीकरांना पर्वणी

रमेश कीर ः स्वा. सावरकर नाट्यगृहात १५ ला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन अलिकडेच मॉरिशस येथे झाले. तेथील मराठी लोकांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे. तेथे गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होतात. तिथल्या या मराठी परंपरांची सांस्कृतिक पर्वणी रत्नागिरीकरांना लाभणार आहे. १५ एप्रिलला सायंकाळी ४ वा. स्वा. सावरकर नाट्यगृहात दोन तासांचा विशेष कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आयोजित केल्याची माहिती ‘कोमसाप’चे विश्वस्त रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक मजबूत व्हावी या हेतूने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ ला कोमसापचे संमेलन मॉरिशस येथे घेण्यात आले होते. मॉरिशस सरकार आणि तीन शासनमान्य मराठी भाषिकांच्या संस्थांनी एकत्रित येत हे संमेलन आयोजित केले होते. या वेळी सांस्कृतिक साहित्याची आदानप्रदान करण्याबाबत चर्चा झाली होती. या संमेलनादरम्यान मराठी पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याकरिता कोमसापकडून ५०० पुस्तकांची भेट देण्यात आली होती. हा स्नेह असाच वृद्धिंगत होण्याकरिता मॉरिशस कल्चरल सेंटरतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
येत्या १५ एप्रिलला २५ जणांची टीम २ तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. पाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असून, यात विनोदी एकांकिका, जाखडी नृत्य आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
-----------
चौकट १
ऊस कामगार ते सत्ताधारी
मॉरिशसमध्ये मराठी लोकांची संख्या भरपूर आहे. मराठी शाळासुद्धा आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात तिथल्या ऊसाची तोडणी करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक भारतीयांना तिकडे नेले. तिथे कामगार म्हणून काम करणाऱ्या या सर्व मराठी लोकांनी आज सत्तेत व महत्वाच्या पदांवर स्थान मिळवले आहे, ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT