कोकण

मतदान जनजागृती घोषवाक्याचा वापर करा

CD

४४ (पान ३ साठी)

मतदान जनजागृती घोषवाक्य वापरा

डॉ. सोपान शिंदे ; ७५ टक्के मतदानाचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडील कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर कार्यालयीन पत्रव्यवहारावर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
सर्व सहाय्यक निबंधक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक, रत्नागिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागरी, ग्रामीण, नोकरांच्या सहकारी पतसंस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना याबाबत डॉ. शिंदे यांनी पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही ७५ पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयात, बँक, सहकारी पतसंस्था, बाजार समितीमार्फत निर्गमित होणाऱ्या तसेच प्राप्त होणारी पत्र, अर्जांची नागरिकांना दुय्यम प्रत (पोच) देताना त्यावरती निवडणूक आयोगाकडील ''देशहिताचे ठेवून भाग, चला करू मतदान!'', ''उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा..'' कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर मतदानाच्या तारखेपर्यंत करावा, असे सूचित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT