कोकण

हे शक्तीप्रदर्शन नव्हे कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना

CD

पान १
७५३११
७५३१२

हे शक्तिप्रदर्शन नव्हे कार्यकर्त्यांच्या भावना
उदय सामंत ः रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंत यांच्या उमेदवारीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : शिवसेनेचे आजचे हे शक्तिप्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. किरण ऊर्फ भय्या सामंत यांना खासदारकीची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मी तर त्यांचा धाकटा भाऊ आहे, माझी भावना वेगळी नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणि आमच्या भावना मी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
हॉटेल विवेकच्या मैदानात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीचे रुपांतर मोठ्या मेळाव्यात झाले. सामंतप्रेमी हजारोच्या संख्येने जमा झाले होते.
उदय सामंत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाच्या एका आमदाराने आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. घरापर्यंत पोहोचू नका, तुमच्यापेक्षा वाईट मी बोलू शकतो. स्वतःचा मतदारसंघ सांभाळा. तुमच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. माझा संयम माझी मजबुरी नाही. बालिश चाळे सोडा. आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचे असते तर चंपक मैदानात केले असते; परंतु या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.’’
सामंत म्हणाले, ‘‘भाजपने या जागेवर दावा केला, बूथ वॉरिअरची बैठक घेतली. त्याबाबत आकस असण्याचे कारण नाही. आपण पुन्हा चर्चा करून सर्व्हे घेऊन निर्णय घ्यावा, असे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगू. कारण एकवेळ मी लोकांच्या संपर्कात कमी पडेन; परंतु भय्यांचा संपर्क माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणून या जागेसाठी सर्वांच्या भावना आहेत. महायुतीचा कोणताही उमेदवार असेल तर त्याला निवडून आणू. मात्र आपली भावना मांडली आहे. सेनेची ताकद दाखवली आहे. महायुतीचा आदर ठेवून काम करायचे आहे. कुठेही कटुता येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कारण आपल्याला पाचही आमदार निवडून आणायचे आहेत. आमची ही फक्त भावनिक नाही तर प्रामाणिक मागणी आहे.’’

तिकीट मागताना
दुसऱ्याची निंदा नको
एखाद्या आमदारावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम असते, हे पाहण्यासाठी राज्यातील आमदारांना रत्नागिरीत यावे लागेल. आजवर सामंत कुटुंबाने संघर्षच केला आहे; परंतु आज पोषक वातावरण आहे म्हणून उमेदवारी मिळावी. आपण उमेदवारी मागताना दुसऱ्याची निंदा करायची नाही. त्यांचाही मानसन्मान ठेवत आमच्यापण प्रचाराची आज सुरुवात झाली, असे म्हणावे लागले असेही सामंत म्हणाले.


प्रचाराचे प्रशिक्षण घ्या
रत्नागिरीत पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे प्रशिक्षण घ्यायला हवे. तशी यंत्रणा मजबूत करा. ८५ वर्षांवरील ३६ हजार मतदार आहेत, तर १७ हजार दिव्यांग आहेत. त्यांना भेटायला सुरू करा. २ लाख मताने जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवा.


नीलेश राणेंना ५० हजारांचे
मताधिक्क्य देऊ ः किरण सामंत
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नारायण राणे यांना विश्वासात घेऊन आपण ही जागा मागितली आहे. लोकसभेबाबत विनाकारण आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, नीलेश राणे यांना कमीत कमी ५० हजारांच्या मताधिक्याने विधानसभेला निवडून आणू, असे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT