Unseasonal Rain Mandangad esakal
कोकण

Unseasonal Rain : मंडणगडला अवकाळी पावसाचा तडाखा; आंबा-काजू पीक धोक्यात, शेतकरी चिंतेत

हापूस आंबा तयार होत असताना तालुक्यात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने शेतकरी चिंतातूर झालेत.

सकाळ डिजिटल टीम

राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातही ढगाळ हवामानामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला; पण त्याचे प्रमाण अतिशय कमी होते.

मंडणगड : उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त असताना सोमवारी (ता. १५) सायंकाळी ढग दाटून आले आणि विजा चमकून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसला. त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या आंबा, काजू पिकाला धोका निर्माण झाला असून तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

यंदाच्या हंगामात झालेला अवकाळी पाऊस, पिकास झालेली थ्रीप्स रोगाची लागण व हमीभावाअभावी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हापूस पिकावर तालुक्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर चालते. याकरिता वर्षभर मेहनत करणारे शेतकरी (Farmer) तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला. तापलेल्या उन्हाने उष्णतेचे सर्व विक्रम मागे टाकत सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येऊन अचानक बदल झाले. रात्र होता होता विजांचा लखलखाट करत पावसाने हजेरी लावली. हापूस आंबा तयार होत असताना तालुक्यात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने शेतकरी चिंतातूर झाले असून, आधीच यावर्षी उत्पन्नाचे प्रमाण अत्यल्प असताना या पावसामुळे तेही वाया जाणार असल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे.

जिल्ह्यात ढगाळ वातावरण

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी रत्नागिरी तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातही ढगाळ हवामानामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला; पण त्याचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT