कोकण

जामसंडे मळईत २२ पासून हनुमान जन्मोत्सव सोहळा

CD

जामसंडे मळईत २२ पासून
हनुमान जन्मोत्सव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा यांच्यावतीने मळईवाडी हनुमान मंदिर येथे सोमवारी (ता.२२) व मंगळवारी (ता.२३) असे दोन दिवस श्री हनुमान मंदिर वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम असे, सोमवार (ता.२२) -सकाळी ७.३० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, ११ वाजता मळई मर्यादित विविध स्पर्धा होतील. यामध्ये रांगोळी, चित्रकला, कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर व प्रश्नोत्तर स्पर्धांचा समावेश आहे. सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता श्री देव मांडकरी प्रासादिक भजन मंडळ, मळई यांचे भजन, रात्री १० वाजता श्री पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे परबवाडी यांचे दिंडी भजन. मंगळवार (ता.२३) सकाळी ६.१८ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी होम-मिनीस्टर स्पर्धा (मळई मर्यादित), रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता स्पर्धांचे बक्षीस वितरण, १० वाजता स्थानिक कलाकारांची ‘लग्न कल्लोळ’ ही विनोदी एकांकिका, ११ वाजता ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी यांचे समई नृत्य सादर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT