कोकण

Kokan Crime News: पावसमध्ये ३ लाख ४२ हजाराचा गुटखा पकडला

CD

Mumbai News: पावस-गाडीअड्डा येथे विनापरवाना गुटख्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटार आणि गुटख्यासह ३ लाख ४२ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी नाकाबंदी कार्यक्रमांतर्गत केली. संशयिताविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


रोशन संजय नाईक (वय २६, रा. कासारवेली, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी पावस-गाडीअड्डा येथे निदर्शनास आली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी नाकाबंदी कार्यक्रमांतर्गत सर्वच गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

गाड्यांची तपासणी करत असताना पावस गाडीअड्डा येथे पूर्णगड ते पावस अशी जाणारी नाईक यांची मोटार पोलिसांनी थांबवली. वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये गुटख्याची पाकिटे सापडली.

२ लाखांची मोटार आणि गुटखा असा ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT