कोकण

श्री ज्योतिबा मंदिरात मंगळवारी जयंती उत्सव

CD

पान ५


श्री ज्योतिबा मंदिरात मंगळवारी जयंती उत्सव
रत्नागिरी ः शहरातील श्रीक्षेत्र पेठकिल्ला येथील श्री ज्योतिबा मंदिरात मंगळवारी (ता. २३) श्री कुलस्वामी ज्योतिबाचा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कुलदेवतेची पूजा व विडा भरणे. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता आरती, मंत्रपुष्प व प्रार्थना. ज्योतिबा सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा. सभेसाठी सर्व सभासद व भक्तगणांनी उपस्थित रहावे. दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद. सायंकाळी ५ वाजता गोंधळ, ज्योतिबाचा शिधा, ज्यांना कोणाला शिधा द्यावयाचा असेल त्यांनी २० ते २३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मंदिरात जमा करावा. ज्योतिबाचा गोंधळ ज्या भक्तांना गोंधळाला बसावयाचे असेल त्यांनी आपली नावे अजय गांधी व सचिन गांधी यांच्याकडे संपर्क साधावा. या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

किल्ला येथे २३ रेकॉर्ड डान्स स्पर्धा
रत्नागिरी ः किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळातर्फे मंगळवारी (ता. २३) श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता ३९ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ, दुपारी १ ते ३ या वेळात महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सुश्राव्य भजन. रात्रो ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात हनुमान मंदिर किल्ला येथे तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा (सोलो) ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे.

गणपतीपुळे पंच कमिटीच्या सरपंचपदी डॉ. केळकर
रत्नागिरी ः तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटीच्या नव्या सरपंचपदी मालुगंड येथील डॉ. श्रीराम केळकर यांनी निवड झाली आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या पंचकमिटीने एकमताने ही निवड केली आहे. या बद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन केले आहे. श्रीरामनवीमच्या पुण्यादिनी ही निवड करण्यात आली. २००९ पासून डॉ. केळकर हे पंच म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे. अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळवू स्वभाव आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या केळकर यांनी निवड संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंचकमिटीवर झाल्याने संपूर्ण मालगुंड व गणपतीपुळे परिसरात विशेष समाधान व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाचा २७ ला स्नेहमेळावा
रत्नागिरी ः कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेहमेळावा शनिवारी (ता. २७) सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात होणार आहे. यावेळी एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या स्नेह मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले आहे. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदनी २०२४-२५ चा वार्षिक आधार निधी रुपये २०० संघाकडे जमा करुन सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : लातूरमध्ये बोहल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Voting Before Wedding: मतदानाचा हक्क बजावून नवरदेवाची लग्नाकडे धाव; तांबवेतील विक्रम पाटील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत!

SCROLL FOR NEXT