कोकण

‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर

CD

79331
एम. बी. कदम, दामोदर जाधव, वि. मो. बावकर, मधुसूदन डांगमोडेकर


‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर

१९ मे रोजी वितरण ः कदम, जाधव, बावकर, डांगमोडेकरांना सन्मान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : ल. रा. जाधव गुरुजी स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा परिवार व जयभीम उत्कर्ष मंडळ, किनळे यांच्यावतीने देण्यात येणारा ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचे पुरस्कार वितरणाचे हे तिसरे वर्ष आहे.
दोडामार्ग तालुक्यातील धम्म चळवळीतील कार्यकर्ते एम. बी. कदम यांना त्यांच्या धम्म प्रसाराच्या कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. फोंडा (ता. कणकवली) येथील दिवंगत दामोदर जाधव, बाव (ता. कुडाळ) येथील दिवंगत वि. मो. बावकर यांना धम्म चळवळीतील योगदानाबद्दल मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वडाचापाट येथे १९६० मध्ये धम्म दीक्षा सोहळ्यात सहभागी मधुसूदन डांगमोडेकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या गावी जाऊन सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ल. रा. जाधव गुरुजी यांच्या सावंतवाडी तालुक्यातील मूळ किनळे गावी १९ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुध्द जयंती संयुक्त कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका सावंतवाडीचे अध्यक्ष प्रा. बी. पी. कांबळी, सचिव आर. जी. चौकेकर तालुका आणि जिल्हाप्रमुख पदाधिकारी आदींसह पुरस्कारप्राप्त मान्यवर व त्यांचे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती ल. रा. जाधव गुरुजी यांचे सुपुत्र सचिन जाधव यांनी परिवार व मंडळाच्यावतीने दिली.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, सन्मानपत्र व भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ''बुद्ध आणि त्याचा धम्म'' हा ग्रंथ असे आहे. जिल्ह्यात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींना १०० टक्के बौद्धमय वस्तीला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुटुंबीयांच्या आणि जयभीम उत्कर्ष मंडळ, किनळे यांच्यावतीने ल. रा. जाधव गुरुजी यांचे बंधू प्रा. आनंद रा. जाधव व सचिन जाधव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT