कोकण

काँग्रेसने ८० वेळा संविधान बदलले

CD

३० (पान ३ साठी)
-----------

काँग्रेसकडून संविधानात ८० वेळा बदल

विनोद तावडे ः सहानुभूतीचा फायदा होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात ८० वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपच्या सुतराम डोक्यात नाही; परंतु संविधान बदलण्यावर काँग्रेसने बोलूच नये, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सहानुभूतीचा कोणालाही फायदा होणार नाही. लोकांना विकास हवा आहे तो मोदींच्या काळात झाला असल्याचे सांगितले.
तावडे म्हणाले, भाजप आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपाने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही; मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहेत. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले.
काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाने पंतप्रधान आवास योजनेतून ४ कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला. पीएम आवासमध्ये २७ लाख घरे महाराष्ट्राला दिली, शौचालय बांधली आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे, असे तावडे यांनी सांगितले.
--------
खालच्या पातळीवरील प्रचार वेदनादायी

पहिल्या टप्प्यात भाजपला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही, अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणे मनाला वेदना देणारे आहे, अशी खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT