कोकण

दापोली समर सायक्लॉथॉन 28 एप्रिलला

CD

३७ ( पान ५ साठी )

दापोली समर सायक्लॉथॉन रविवारी

प्रसिद्ध सायकलपटूंचा सहभाग; ६ तासात ६० किमी अंतर

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २५ : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकलसंस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २८ एप्रिलला सकाळी दापोली समर सायक्लॉथॉन २०२४, सीझन ५ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.
ही स्पर्धा १ ते ६० किमी अंतराची असून, ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रूट, शॉर्ट सिटी लूप, फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल शिवाय काही खास बक्षिसे पण असतील. ६० किमी सायक्लॉथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते हर्णै, मुर्डी, आंजर्ले, आडे, उटंबर, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ही स्पर्धा सकाळी पाच वाजता सुरू होईल. स्पर्धकांना ६ तासात ६० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत असेल. शॉर्ट सिटी लूप मार्ग दापोली शहरातील ४ किमीचा असेल. फनराईड विनामूल्य असून, ७ वाजता सुरू होईल.
यासाठी नोंदणी आवश्यक असून, नोंदणी फॉर्म विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, राऊत सायकल वडाचा कोंड, परेश बुटाला जालगाव या ठिकाणी देऊ शकता. सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत सायकल चालवत यामध्ये सहभागी व्हा आणि तंदुरुस्त जीवनशैली अनुभवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT