कोकण

निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण

CD

पान ५ साठी, संक्षिप्त)
सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका
निवडणुकीत महत्त्वपूर्ण
दाभोळ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत निवडणूक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जव्हर्स) यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी नि:पक्षपातीपणे पार पाडावी, असे निर्देश रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले. रायगड लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षक झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आदी उपस्थित होते. या वेळी निवडणूक निरीक्षक झा म्हणाले, नि:पक्ष आणि मोकळ्या वातावरणात होणाऱ्या निवडणुकीचे सूक्ष्म निरीक्षक हे साक्षीदार आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसून, ते निवडणूक निरीक्षक आणि आयोगास उत्तरदायी आहेत.

एनएमएमएस परीक्षेत
आर्यन पवारचे यश
दाभोळ : दापोली तालुक्यातील विरसई जनसेवा मंडळ संचालित विरेश्वर विद्यालयातील आर्यन पवारने एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवला. या परीक्षेत विद्यालयाचे लावण्या फराटे, करिना तटकरे, केतकी तांबुटकर, पवन मासेकर, आर्यन पवार असे एकूण ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी आर्यन पवारने जिल्हा गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक मिळवला.

आंजर्लेत मराठा समाजाची सभा
दाभोळ : दापोली तालुक्यातील आसूदबाग ते केळशी या गटाची सकल मराठा समाज संघटनेची सभा आंजर्ले येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला दापोली, मंडणगड, खेड मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी आणि आसूदबाग ते केळशी गटाचे अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार कवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष प्रसाद पाटेकर, सचिव पराग जाधव, उपसचिव रवींद्र फुटे, खजिनदार सुभाष गोळे यांच्यासह आसूद, सालदुरे, मुरूड, हर्णे, केळशी, सुकोंडी आणि आंजर्ले येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.

एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी
अमृता गायकवाडची निवड
दाभोळ : सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरेतील विद्यार्थिनी अमृता गायकवाड ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी, तर सात विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झालेली आहे. राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्तीधारकास प्रत्येकी एका वर्षाला १२ हजार रुपयांप्रमाणे यापूर्वी चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जात होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार पाच वर्षे म्हणजे सुमारे ६० हजार रुपये शिष्यवृत्ती अमृता गायकवाड हिला मिळणार आहे. टाळसुरे विद्यालयामधून एकूण १४ विद्यार्थी आर्थिक मागास दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी अमृता गायकवाड ही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे, तर महाराष्ट्र शासनाची सारथी शिष्यवृत्तीकरिता मराठा व कुणबी प्रवर्गामधील ७ विद्यार्थी उत्तीर्ण असल्यामुळे ते सारथी शिष्यवृत्तीकरिता पात्र झाले आहेत. शिक्षक नझिर मुसा, पांडुरंग शिंदे, समीर भोसले, भरत गोताड, शारदा अलगुडे, दीपनंदा बोधे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT