

Pune Teachers MLC election devendra fadanvis eknath shinde sunetra pawar
esakal
Maharashtra Legislative Council election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रतिष्ठेच्या पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीनंतर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.