कोकण

आक्षेपार्ह मजकुर प्रसिध्दप्रकरणी दोन्ही गटांतील कार्यकर्ते पोलिसांत

CD

आक्षेपार्ह मजकुर प्रसिध्दप्रकरणी
दोन्ही गटांतील कार्यकर्ते पोलिसांत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकुर प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला.
अधिक माहिती अशी कीः एका वरिष्ठ पक्षाच्या राजकीय नेत्याविरोधात एका अल्पवयीन मुलाने व्हॉटसअॅपवर बदनामीकारक स्टेटस ठेवला होता. याला संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत थेट पोलिस ठाणे गाठले. यानंतर या अल्पवयीन युवकाच्या पक्षातील कार्यकर्तेही काही वेळातच पोलिसात दाखल झाले. यावेळी दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापले. कुडाळ पोलिसातही दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याने वातावरण अधिकच बिघडले; मात्र यानंतर दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधातील सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराची माहिती पोलिसांना दिली. याचा दखल घेत या दोन्ही राजकीय पक्षातील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक मुल्ला यांनी दिली. याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या कार्यकत्यांकडून तक्रार दाखल होत असल्याचे समजताच विरोधी पक्षाच्या उमेदवाराविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुराचा विषय आणून त्याबाबतही तक्रार दिली. त्यामुळे आता या विषयावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे मुल्ला यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हा वाद मिटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT