Konkan Politics
Konkan Politics sakal
कोकण

Konkan Politics: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची सभा, राणेंना फोडणार घाम?

सकाळ वृत्तसेवा

Narayan Rane: महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (ता. २८) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत येणार असून त्या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे ठाकरीभाषेत ते कोणावर कडाडणार, याकडे लक्ष आहे.

शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाशेजारी संध्याकाळी ६ वा. त्यांची जाहीर सभा होणार असून, या वेळी ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात राऊत हे निवडणूक रिंगणात मोठ्या तयारीने उतरलेले आहेत.

त्यांच्या प्रचारासाठी उबाठाचे युवानेते आदित्य ठाकरे यांची ४ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे तसेच राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही जाहीर सभा होणार आहेत.

ठाकरे हे रत्नागिरीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यापूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते तसेच मतदार संघातील राष्ट्रवादी, आप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बैठका होणार आहेत.

महाविकास आघाडीतील समन्वय चांगला असून, एकोप्याने काम सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT