कोकण

सामंतांचे दुकान बंद करण्याचे काम राणेंकडून

CD

पान १
सामंतांचे दुकान बंद
करणे राणेंकडून सुरू
विनायक राऊत : सामंत कुटुंबीयांबद्दल आदरच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. देशात, महाराष्ट्रात उद्योग आणण्याचे काम ते करतात; पण केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणे रत्नागिरीचा विकास मीच करणार. ३ वर्षांत येथे मीच उद्योग आणणार. जिल्ह्याचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. त्यामुळे उदय सामंतांना विनंती करायची आहे, तुमचे येथील दुकान बंद करण्याचे काम आता राणेंनी सुरू केले आहे, असा टोला विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या नाचणे येथील मेळाव्यात राऊत म्हणाले, ‘‘आजपर्यंत आम्ही कधीही सामंत कुटुंबीयांचा अवमान केलेला नाही. कधीही अपमानकारक शब्दही मी काढलेले नाहीत. आदरणीय आण्णा सामंत, किरण ऊर्फ भैया सामंत असोत वा उद्योगमंत्री उदय सामंत असतील आम्ही नेहमीच त्यांच्याशी आदराने बोलतो. आमच्यात राजकीय वैर तर आहेच; पण एक आदर, माणुसकी, कोकणातील संस्कार याची आठवण तरी राणेंना झाली पाहिजे होती.’’
आजपर्यंत किरण सामंतांना, कोण हा किरण सामंत, असं कुणी कधीतरी विचारलं का, असा सवाल राऊत यांनी या मेळाव्यात उपस्थितांसमोर केला; पण केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मागील पत्रकार परिषदेत कोण तो किरण सामंत, असे जेव्हा अवमानकारक शब्द उच्चारले त्याच वेळेस नारायण राणेसाहेब तुमचं जहाज बुडालं म्हणजे बुडालं असं सांगत सूचक इशाराच राऊत यांनी दिला आहे. सामंत कुटुंबीयांनी स्वतःविषयी आदर निर्माण केला होता. आमचे राजकीय वैर असले तरी त्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो, असे विनायक राऊत म्हणाले.

राणेंचे वक्तव्य...
स्वतः नारायण राणे केंद्रात उद्योगखात्याशी निगडित असलेले खाते सांभाळत आहेत. मग रत्नागिरीत उद्योगधंदे बंद झाले, असे जेव्हा सांगतात तेव्हा ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT