कोकण

रत्नागिरी सीए शाखेतर्फे मार्गदर्शन सत्र

CD

२६ (पान २ साठी)

rat२८p१०.jpg-
P२४M८०३१२
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित चर्चासत्रावेळी व्याख्यात्या सीए अमृता कुलकर्णी यांचे स्वागत करताना रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये. डावीकडून सीए केदार करंबेळकर, सीए शैलेश हळबे.

जीएसटी संदर्भात रत्नागिरीत मार्गदर्शन सत्र

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने पीअर रिव्ह्यू आणि जीएसटीमधील सध्याचे प्रश्न या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे आयोजित सत्रात पुणे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी आणि रत्नागिरीतील अॅड. अभिजित बेर्डे यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्राच्या सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. लेखा परीक्षण करताना अवलंबलेल्या प्रक्रिया आणि पद्धती योग्य रितीने कशा नोंद करून ठेवाव्यात, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सीए इन्स्टिट्यूटने सनदी लेखापालांच्या कामाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या पीअर रिव्ह्यू बोर्ड आणि त्यांच्या कार्यप्रणालीची ही थोडक्यात माहिती त्यांनी दिली.
दुपारच्या सत्रात रत्नागिरीतील प्रसिद्ध जीएसटी सल्लागार अॅड. अभिजित बेर्डे यांनी जीएसटी कायद्यतील विविध प्रश्न आणि त्यासंदर्भातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांवर चर्चा केली. जीएसटी नोंदणी, अपील, जमिनींच्या व्यवहारावरील कर आकारणी, उत्खनन रॉयल्टीसंदर्भातील जीएसटी तरतुदी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जीएसटी अॅडव्हान्स रुलिंग अॅथॉरिटीच्या निर्णयांच्या अनुषंगाने सखोल विवेचन त्यांनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून समर्पक अशी उत्तरे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: फ्लॅटमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, बनावट ग्राहकांच्या मदतीने पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Naseeruddin Shah: 'प्रशंसा न करणं म्हणजे देशद्रोह...'! नसीरुद्दीन शाहांचा सरकारवर हल्लाबोल; ‘१९८४’ची आठवण गिरवली, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: जुन्नरमध्ये एका आरोपीवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई

OTT वर आणखी एक कोर्टरूम ड्रामा; ‘अमर विश्वास’चा ट्रेलर प्रसिद्ध; मुख्य भूमिकेत झळकणार हे अभिनेते

TRP मध्ये कमळी, स्वानंदी अन् तारिणीचं वर्चस्व! स्टार प्रवाहच्या टॉप मालिकांना धोबीपछाड; कोण कुठल्या स्थानावर?

SCROLL FOR NEXT