कोकण

रत्नागिरीत उदय असल्याने विजयाचा विश्वास

CD

४१ ( पान ३ साठी )

rat२८p३७.jpg-
२४M८०४१८
रत्नागिरी : महायुतीच्या प्रचारसभेत महायुतीचे उमेदवार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना राजन शेट्ये, राजेश्वरी शेट्ये, कौशल्या शेट्ये, सुजाता साळवी, स्मितल पावसकर आदी.

रत्नागिरीत उदय असल्याने विजयाचा विश्वास

नारायण राणे; शहरात महायुतीच्या प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : सामंत कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत, मी एकटा नाही. मला येथे धोका वाटत नाही. उदय म्हणजे माझा विश्वास आहे, मी अविश्वास ठेवून काम करत नाही. त्यामुळे रत्नागिरीतून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार आहे. मित्र असलेला व राज्याचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचा विकास करत आहेत. त्याच्या जोडीला मोदी सरकारच्या माध्यमातून रत्नागिरीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.
उद्यमनगर, पटवर्धनवाडी येथील लोकमान्य टिळक सभागृहात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले की, कोरोना काळात व्यवसाय, दुकाने, कारखाने बंद पडले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्याकरिता प्रयत्न केले. माझ्या खात्याला साडेपाच लक्ष कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून कारखाने उभे राहिले व कामगारांना रोजगार मिळाला. याप्रसंगी मंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजन शेट्ये, राजेश्वरी शेट्ये, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, सुदेश मयेकर, स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उमेश कुळकर्णी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रवीण देसाई, कौशल्या शेट्ये, निमेश नायर आदी उपस्थित होते.
--------------------------------
रत्नागिरीत विकासगंगा
मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरीचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व मंत्री नारायण राणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. शहरालगतच्या उद्यमनगर येथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी मिळत आहे. त्यातून विकासकामे सुरू आहेत.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Amazon Layoffs : मे महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांची कपात! 3 महिन्यांत पुन्हा नोकरकपात; AI मुळे नोकऱ्यांवर संकट?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

SCROLL FOR NEXT