कोकण

राणेंना सावंतवाडीवासीय साथ देतील

CD

swt29११.jpg

संजू परब

राणेंना सावंतवाडीवासीय साथ देतील
संजू परब ः शहरात गुरुवारी प्रचार फेरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः महायुती सरकारने शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील, असा विश्वास आहे. त्यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार फेरीचे आयोजन केले आहे. यात महायुतीचे एक हजारांहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे वारे चालू आहेत‌. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार आहेत. अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं ते निवडणूक येतील. शहरातून ८० टक्के मतदान त्यांना होईल. २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार फेरीचे आयोजन केले आहे. शहरातून ही फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व महायुतीचे नेते असतील. प्रचार कार्यालयाकडून या फेरीचा शुभारंभ होईल. किमान १ हजार पेक्षा अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विकासाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. महायुती सरकारनं शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील अशी माहिती संजू परब यांनी दिली. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT