कोकण

आज चोरांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुखांचा फोटो

CD

४२ ( पान ३ )


- ratchl२६४.jpg -
24M80522
चिपळूण ः पेढेतील प्रचार सभेत मार्गदर्शन करताना आमदार जाधव

चोरांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुखांचा फोटो

आमदार भास्कर जाधव ः बाळासाहेब अश्रू ढाळत असतील

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. २७ ः लोकसभा निवडणूक प्रचारात आज चोरांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. आपल्याला ही शिवसेना पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी आज मशाल प्रज्वलित करून आपल्याला आपला धनुष्यबाण मिळवायचा आहे, असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत व्यक्त केले.
शहरालगतच्या पेढे येथे पेढे व मालदोली जिल्हा परिषद गटाची प्रचारसभा झाली. जाधव म्हणाले, याआधी अशी कधीही निवडणूक नव्हती. आपल्याला पुन्हा धनुष्यबाण मिळवायचा आहे. आज स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरे अश्रू ढाळत असतील कारण चोरांच्या बॅनरवर त्यांचा फोटो लागला आहे. बाळासाहेबांच्या नावाने मते मिळविणारे हे चोर आज त्यांच्या बॅनरवर त्यांचा फोटो लावत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या मुलांना शिव्या देतात, वाट्टेल ते आरोप करतात हे आपल्याला मान्य आहे का? हे मान्य नसेल तर यावेळी मशाल प्रज्वलित करायला हवी आणि ही मशाल पेटवून ही गद्दारी, ही चोरी आणि विश्वासघात दाखवून देऊन विनायक राऊत यांना निवडून द्यायला हवे आणि पुन्हा धनुष्यबाण मिळवायला हवा. त्यासाठी सर्व बाजूला ठेवून आपल्यापासून दूर गेलेल्यांना जवळ करा.
विनायक राऊत म्हणाले, राणे यांचे रत्नागिरीत दोन बंगले, सिंधुदुर्गमध्ये पाच, मुंबईमध्ये बंगले, १९ कोटींचे दागिने अशी अधिकृत संपत्ती आहे. मात्र, त्यांनी खरी संपत्ती दाखविलेली नाही. त्यांनी गुंडशाही, दडपशाही करून सातत्याने राजकारण केले. कोकणची ही संस्कृती नाही, आपण मात्र सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहून दोनवेळा नगरसेवक, दोनवेळा आमदार व दोनवेळा खासदार झालो. आता तिसऱ्यावेळी आपण त्यांना पराभूत करणार. यावेळी व्यासपीठावर सचिन कदम, बाळा कदम, विक्रांत जाधव, विनोद झगडे उपस्थित होते.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT