कोकण

दापोली शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा

CD

दापोली शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा
उष्णतेमुळे भूजलपातळीत घट; चार गावांना टँकरचे पाणी
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ : वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत घट झाली असल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे. दापोली तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी चार गावांमध्ये पाण्याचा टँकर धावत आहे तर दापोली शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा चालू झाला आहे.
दापोली तालुक्यातील केळशी, उंबरशेत, बुरोंडी, ओणी भाटी व मुरूड अशा पाच गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. उंबरशेत, बुरोंडी, ओणीभाटी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून मुरूड येथे देखील लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत असली तरी पाण्याची वाहतूक करणारा एकच टँकर आहे. त्यामुळे या एकाच टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसरत होत आहे.
दापोली प्रशासनाला अधिक टँकरची गरज असली तरी दरवर्षी एकाच टँकरवर प्रशासन पाणीपुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. एप्रिलपासून गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यायत आली. अजून मेमध्ये पूर्ण जायचा आहे. एप्रिलमध्ये ५ गावांनी टँकरची मागणी केली आहे तर मे मध्ये टँकर मागणीची संख्या वाढण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही नागरिक प्रशासनाच्या पाणीपुरवठ्यावर अवंलबून न राहता खासगीरित्या पाण्याच्या गाड्या मागवून आपली तहान भागवत असल्याचे देखील चित्र दापोलीत पाहायला मिळत आहे.
दापोली शहराला कोडजाई व नारगोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी काही दिवस आधीच दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपंचायतीकडून करण्यात आले होते. यामुळे वेळीच केलेल्या नियोजनामुळे पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिला होता; परंतु एप्रिल महिन्याच्या अखेरीस आता शहरवासियांना चार दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले. सध्या कोडजाई नदीतील पाणीसाठा संपला असून नारगोली धरणातून पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT