कोकण

रस्त्याचे काम रखडल्याने असगणी ग्रामस्थ आक्रमक

CD

रस्त्याचे काम रखडल्याने
असगणी ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ः तालुक्यातील असगणी गाव ते मोहल्ला या दरम्यानच्या रस्त्याचे काम चार महिन्यांपासून रखडल्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दोन्ही बाजूने रस्ताच बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच याची गंभीर दखल बांधकाम खात्याने न घेतल्यास आंदोलन करू, असे सामाजिक कार्यकर्ते हुसैन घारे यांनी सांगितले.
असगणी ग्रामस्थांसाठी रहदारीच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्याची दुरुस्तीच रखडल्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चिपळूण येथील एका ठेकेदारास रस्त्याचे काम देण्यात आले होते; मात्र कामाला प्रारंभ झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. रस्त्यावर केवळ खडी व माती पसरवण्यात आली आहे. त्यामुळे लगतच्या ग्रामस्थांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या ४ महिन्यांपासून रस्त्याचे काम ठप्प आहे. पावसाळा काही दिवसांवरच आला असताना रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागणार आहे. रस्त्यावर पसरण्यात आलेली खडी व माती तशीच ठेवली आहे. या कामापोटी शासनाला स्वामित्वधन भरले की नाही, याच्या चौकशीची मागणी घारे यांनी केली आहे. रस्त्याचे काम तातडीने हाती न घेतल्यास रस्ता अडवून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT