कोकण

लोटे परशुराम परिसरात टाकाऊ अवशेषांमुळे दुर्गंधी

CD

१५ ( पान ५ साठी )

लोटे परशुराम परिसरात अवशेषांमुळे दुर्गंधी

चिकन, मटण टाकण्यासाठी नाल्याचा आधार; यंत्रणेकडून दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. २९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे परशुराम परिसरात रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या चिकन, मटणाच्या टाकाऊ अवशेषांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महामार्गालगतच्या नाल्यांचा आधार घेऊन हे अवशेष टाकले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे ना ग्रामपंचायतीचे लक्ष ना औद्योगिक वसाहतीमधील संबंधित यंत्रणेचे, त्यामुळे हा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे.
एकीकडे सातत्याने प्रदुषणाचा मुद्दा समोर येत असतानाच आता महामार्गावर चिकन, मटणाच्या टाकाऊ अवशेषांमुळे प्रवास करणे नकोसे झाले आहे. लोटे परशुराम ही खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहत असून, येथील प्रदुषणाचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला आहे. त्यातच आता याच परिसरात चिकन, मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांकडून पर्यावरणाचा समतोल बिघडवला जात आहे. चिकन, मटण विक्री करताना त्यातील टाकाऊ अवशेषांची योग्य विल्हेवाट लावणे विक्रेत्यांना बंधनकारक आहे; मात्र, या आदेशाची विक्रेत्यांकडून पायमल्ली होत असल्याचे समोर येत आहे. अनेक विक्रेत्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवानाही नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या परिसरातील दुकानांची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करण्याची मागणी होत आहे तसेच दुकानातून निघणारे टाकाऊ अवशेष नाल्यात टाकल्याने नदीनाले, खाडी दूषित होत आहे. याकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले जात आहे. दोन्ही विभागाने याची गंभीर दखल घेऊन महामार्गावरील किंबहुना आजुबाजूचा प्रवास दुर्गंधीमुक्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT