कोकण

सासोलीत कंपनीचा कर्मचारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी

CD

सासोलीत कंपनीचा कर्मचारी
मारहाणीमध्ये गंभीर जखमी

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. २९ ः सासोली येथील एका कंपनीच्या शाखेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शनिवारी (ता. २७) दुपारी घडली. यात नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग (वय ४७, रा. डी १५/१००१ सुपरटेक इको व्हिलेज, टू ग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. याबाबत येथील पोलिस ठाण्यात सहा अज्ञातांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की ः नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग हे सासोली येथील एका कंपनीच्या शाखेत सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरी करतात. ते शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास कंपनीच्या सासोली येथील शाखेवर कामाची पाहणी करत होते. यावेळी तेथे गुरे जाण्याच्या मार्गावर तीन दुचाकीवरून अनोळखी सहाजण आले. त्यांच्या हातात हॉकी स्टिक, बेसबॉल बॅट व दांडा होता. काहीही न विचारता त्यांनी बेग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बेग यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गोव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून येथील पोलिस ठाण्याला रितसर जखमी बेग यांच्याबाबत कळविण्यात आले. येथील पोलिस ठाण्यात त्या सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भगत करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ओतारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT