कोकण

गतवर्षीच्या तुलनेत कॅनिंग दर निम्म्यावर

CD

rat२९p२८.jpg
८०५७०
राजापूरः पेट्या भरण्यासाठी काढलेले आंबे.

rat२९p२९.jpg
८०५७१
राजापूरः भरलेली आंब्याची पेटी.

गतवर्षीच्या तुलनेत कॅनिंग दर निम्म्यावर
प्रतिकिलो २५ ते २७ रुपये भाव; बागायतदारांच्या वाढल्या आर्थिक चिंता

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः आधीच उत्पन्न घटलेले आणि आंब्याचा कमालीचा घसरलेला दर यामुळे आंबा बागायतदार चिंताक्रांत झालेले आहेत. त्यामध्ये आता गतवर्षी ४०-४५ रुपये प्रतिकिलो असणारा आंबा कॅनिंगचा दर यावर्षी निम्म्यावर म्हणजे २५-२७ रुपयांवर आल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे. या साऱ्यातून हंगामासाठी केलेला खर्च भागवायचा कसा? बँकेची कर्जफेड कशी करायची? अशी चिंता आंबा बागायतदारांना भेडसावत आहे.
यावर्षी सातत्याने प्रतिकूल हवामान राहिल्याने हापूसचे कमालीचे उत्पन्न घटले आहे. आंब्यासाठी वारंवार करावी लागलेली फवारणी, खतांची मात्रा आदींसाठी करावा लागणारा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातून भागणार की नाही? अशी चिंता बागायतदारांसह व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र, हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरवातीपासून चांगलाच दर मिळाला; मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंब्याच्या पेटीच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे. २४००-२५०० रुपये पेटीला असलेला दर गेल्या काही दिवसांपासून १४००-१५०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. मे महिन्यामध्ये आंबा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये राहणार असल्याने सध्याच्या दरामध्ये आणखीनच घसरण होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आंबा कॅनिंगलचा चांगलाच दर मिळण्याची आशा बागायतदारांना होती; मात्र तीही फोल ठरली आहे.

कोट
आंब्याची पेटी भरण्यापासून बाजारपेठेमध्ये पाठवण्यापर्यंत येणारा खर्च आणि मिळणारा पेटीचा दर यामध्ये कमालीची तफावत आढळते. अशा स्थितीत आंबापेटी पाठवणे डोईजड होते. त्यामुळे आंबा कॅनिंगला देण्यावर भर दिला जातो; मात्र, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी दर कमालीचा घसरला आहे. त्यामुळे हंगामातील खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसवायचा कसा?
- शिवा, आंबा बागायतदार

चौकट
दृष्टिक्षेपात...
*हंगामाच्या सुरवातीला प्रतिकूल हवामान
*सरासरी आंबा उत्पन्न ४० टक्के
*आरंभाला पेटीला चांगला दर नंतर घसरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT