कोकण

क्राईम

CD

२२ (पान ३ साठी)

मधमाश्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

रत्नागिरी ः लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशा चावल्याने वृद्ध जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश शिवराम पाटोळे (वय ६५, रा. कुरचुंबे-जाधववाडी, ता. लांजा) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी नऊच्या सुमारास कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराचा आठवा वर्धापनदिन होता. त्यासाठी जाधववाडीतून या कार्यक्रमाला जखमी प्रकाश पाटोळे व चंद्रकांत जाधव हे दोघे गेले होते. वर्धापनदिनानिमित्त हे दोघे महाप्रसाद जेवण करत असताना त्यांना एका झाडाखाली चूल मांडली होती. त्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. या माशा प्रकाश पाटोळे यांना चावल्या. याची नोंद रुग्णालयाच्या पोलिस चौकीत झाली.
-----------
धानकोली येथे अज्ञाताचा मृतदेह

दाभोळ : दापोली तालुक्यातील साकुर्डे गावाजवळ असलेल्या धानकोली तांदूळ डोह या ठिकाणी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानकोली गावामधील तांदूळ डोह या ठिकाणी अज्ञात पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात कांगवईचे पोलिस पाटील अजय कदम यांनी दिली. या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असून, दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT