कोकण

मंडणगड - तुळशी यात्रेवर पाले, माहुचा विजयी डंका

CD

Rat29p8.jpg
80484
तुळशीः अचूक उत्तरे देणाऱ्या पाले व माहू कलापथकांना विजयी ढाल देऊन सन्मानित करताना गावप्रमुख.

Rat29p9.jpg -
80485
प्रश्नोत्तरी डबलबारी तमाशा सामन्यात कला सादर करताना कलापथक.

तुळशी यात्रेवर पाले, माहुचा विजयी डंका
प्रश्नोत्तरी तमाशाचा सामना; ग्रामस्थांनी दिली ढाल
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ः तालुक्यातील तुळशी येथील भैरवनाथाचे ग्रामोत्सवनिमित्त आयोजित डबलबारी प्रश्नोत्तरी तमाशा सामन्यात पाले व माहू या दोन्ही तमाशा कला पथकांनी अचूक उत्तरे देत आपला विजयी डंका वाजविला. त्यांना ग्रामस्थांच्या वतीने मानाची विजयी ढाल देवून गौरविण्यात आले. हा सामना २३ एप्रिलला रात्रभर रंगला.
हनुमान जयंतीनिमित्त तुळशी ग्रामदेवाचा चैत्रीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या निमित्ताने रसिकांच्या मनोरंजनासाठी शक्तीतुरा असे प्रश्नोत्तरी डबलबारी सामन्याचे आयोजन केले होते. भानुदास घराण्यातील जननीमाता नृत्य कलापथक पाले वरचीआळी शक्तीवाले आणि संभुराजू घराण्यातील चाळकेश्वर लोककला तमाशा मंडळ माहू तांबीटकरवाडी तुरेवाले या दोन कलापथकांमध्ये हा सामना रंगला. कार्यक्रमाच्या पंधरा दिवस आधी दोन्ही कला पथकांनी एकमेकांना प्रश्न दिले होते. या हारजित सामन्यासाठी पंच म्हणून शाहीर महादेव माळी, शाहीर प्रशांत नाकती, शाहीर संतोष पार्टे यांची नेमणूक करण्यात आली होती. नियमाप्रमाणे शक्तीवाले शाहीर दिनेश रक्ते, शाहीर प्रकाश रक्ते आणि मंडळींनी प्रथम आपली कला सादर करताना रसिकांना मंत्रमुग्ध केले तर तुरेवाले शाहीर मोहन तांबीटकर, शाहीर शिवराम तांबीटकर यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमात गण, गौळण, पद, टोणपा असा शास्त्र, पुराण यांचा संदर्भ घेऊन श्रेष्ठत्वाचा वाद रंगला. पहाटे सहा वाजता पंचांनी निकाल वाचन केले असता दोन्ही कलापथकांनी एकमेकांची लिखित दिलेली उत्तरे ही अचूक असल्याचे घोषित केले. यानंतर तुळशी ग्रामस्थांच्यावतीने दोन्ही पथकांना मान्यवरांच्या हस्ते विजयाची ढाल प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT