कोकण

१०० फूट ध्वजस्तंभाचा १ मेचा मुहुर्तही चुकणार

CD

rat29p25.jpg
80565
दापोली : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ.

शंभर फूट ध्वजस्तंभाचा
उद्याचा मुहुर्तही चुकणार
३३ लाखाचा खर्च; प्रशासनाकडून संदिग्धताच
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ : दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या १०० फूट ध्वजस्तंभावर १ मे रोजी तरी तिरंगा फडकविण्यात येणार का? असा सवाल दापोलीतील नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाला केला जात आहे.
या संदर्भात दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनकडून काही कळविलेले नाही असे सांगितले तर निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती घ्यावी लागेल असे सांगितले. यावरून शासकीय पातळीवर महाराष्ट्र दिनी तरी ३३ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकणार की नाही याविषयी संदिग्धताच आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यामधील तहसील कार्यालय आवारात १०० फुटी ध्वजस्तंभ उभारले आहेत. १५ ऑगस्ट २०२३ च्या अगोदर ८ दिवस दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून ध्वजस्तंभ उभारला असून १४ ऑगस्ट २०२३ रोजी त्यावर तिरंगा फडकविण्याची चाचणी घेतली होती. त्यामुळे दापोलीकर नागरिकांना या ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविला जाईल, असे वाटत होते मात्र कोठेतरी माशी शिंकली व तिरंगा काही फडकविण्यात आला नाही. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी २०२४ रोजीही या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात आला नाही. आता महाराष्ट्र दिनी तरी या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविणार का असा सवाल दापोलीतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT