कोकण

गोव्याची तहान भागावणारे पाणी तिलारी येथून जाते

CD

३५ (पान ३ साठी)


- rat२९p३५.jpg-
२४M८०६१४
दोडामार्ग ः येथील पिंपळेश्वर हॉल येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना खासदार विनायक राऊत.

गोव्याची तहान भागावणारे पाणी तिलारीतून

खासदार राऊत ः काजूला हमीभाव का देत नाही

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २९ ः तरूणांच्या रोजगाराच्या मुळावर जर कोण उठत असतील तर पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे इंडीया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिला.
येथील पिंपळेश्वर हॉल येथे आयोजित लोकसभेच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, प्रमोद सावंत आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असले, तरी आज ते गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि नारायण राणे यांचे प्रचारप्रमुख सुद्धा आहेत. हेच सावंत आपल्या इथल्या तरुणांना गोवा राज्यात नोकरी करण्यास बंधने घालत आहेत, त्यांचा रोजगार हिरावून घेत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की असे जर करणार असाल तर लक्षात ठेवा गोव्याची तहान भागावणारे तिलारी चे पाणी सिंधुदुर्गातून जाते. असा इशारा ही यावेळी त्यांनी प्रमोद सावंत यांना दिला. त्यांनी प्रमोद सावंत हे फक्त ७०० मतांनी निवडून आले आहेत याची आठवण करून देत जर आमच्या पोरांच्या रोजगाराच्या मुळावर जर ते उठत असतील तर पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
याप्रसंगी राऊत यांनी काजूला मिळणाऱ्या हमीभावाविषयी प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, गोव्यात काजुला जो हमीभाव मिळतो तो आमच्या काजुला का दिला जात नाही. इकोसेन्सिटिव्ह मधील जाचक अटी रद्द करा. या सभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांची उपस्थिती लक्षवेधक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway toll naka: मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार! केंद्र सरकारकडून टेंडर काढून ठेकेदार निश्चितीची तयारी

CJI SuryaKant: इतका हल्ला करण्याची गरज नाही; आम्हालाही मर्यादा माहीत आहेत; सरन्यायाधीश का संतापले आहेत?

Latest Marathi News Live Update: धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका

Trimbakeshwar Encroachment Removal : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्रशासनाचा 'बुलडोझर'! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई; दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त

Mumbai Weather: मुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT