कोकण

आग

CD

३९ (पान ३ साठी, मेन )


rat२९p३६.jpg-
२४M८०६४१
रत्नागिरी- शहरातील आठवडा बाजारातील भंगार गोदामाला लागलेली आग.
rat२९p३७.jpg-
P२४M८०६४२
अग्निशमन दलाच्या जावानांनी शर्थीचे प्रयत्न करून तत्काळ आग आटोक्यात आणली.
-----------

रत्नागिरीत भंगार डेपोला आग

कारण अस्पष्ट ; गोंधळ, वाहतूक कोंडी, अग्निशामक दलाचे यशस्वी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा ः

रत्नागिरी, ता. २९ : शहरातील आठवडा बाजार येथे भंगार डेपोला अचानक आग लागली. त्यामुळे पत्र्याच्या कंपाऊंडमधुन आगीचे लोळ बाहेर पडु लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि यंत्रणेची धावपळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ याची माहिती पालिकेच्या व एमआयडीसी अग्निशमन दलाला दिली. दोन्ही बंब घटनास्थळी वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आली. आग लागल्यानंतर नागरिकांनी ही गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली.
शहरातील आठवडा बाजार येथे मोठा भंगार डेपो आहे. या डेपोला पत्र्याचे कंपाऊंड आहे. नेमका हा डेपो कोणाचा आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास या भंगार डेपोला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ पत्र्याच्या कंपाऊंड बाहेर पडु लागले. तसा एकच गोंधळ उडाला. आग... आग... अशी आरडाओरड सुरू झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. स्थानिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन केला. पालिकेचे बंब तत्काळ दाखल झाला. परंतु आगीने बराचसा परिसर घेरला होता. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धुराचे लोळ उसळत होते. दुर्गंधी पसरली होती. काही लोकांसाठी हे निवाऱ्याचेही ठिकाण आहे. या आगीचे स्वरुप वाढल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तरीही त्यांचा आरडा-ओरडा सुरु केली.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी संजय साळवी, बिपिन बंदरकर यांच्यासह अनेक जण घटनास्थळी दाखल झाले. पालिकेने भडकणाऱ्या आगीवर पाणी मारल्यानंतर धुरांचे लोट सुरु झाले त्यानंतर एमआयडीसीचा बंब आल्यावर ही आग आटोक्यात आणली. परंतु आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही.

नुकसानाची माहिती घेणे सुरू
भंगार डेपोला लागलेल्या आगीत नेमके किती रुपयाचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती घेण्याचे काम अग्निशामक दलाकडून सुरू आहे.

..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT