कोकण

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरीत आज ध्वजवंदन

CD

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त
सिंधुदुर्गनगरीत आज ध्वजवंदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३०ः महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिन कार्यक्रम उद्या (ता. १) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी ८ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय, पोलिस परेड ग्राऊंड येथे होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. ध्वजवंदनानंतर सकाळी ८.१५ वाजता पोलिस, राखीव व पोलिस दल यांचे संचलन होणार आहे. उद्या (ता. १) सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला वैयक्तिक ध्वजवंदन करावयाचे असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ वाजण्यापूर्वी किंवा ९ वाजल्यानंतर आयोजित करावा. समारंभाला राष्ट्रीय पोषाखात यावे. आचारसंहितेचे पालन करून नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT