कोकण

बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेत 128 स्पर्धक सहभागी

CD

२२ (टूडे ३ साठी)


- rat३०p१३.jpg -
P२४M८०६८०
राजापूर ः स्पर्धेचे उद्घाटन करताना पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि मान्यवर.


बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेस सुरवात

गोवा क्लब, रॉयल अ‍ॅकडमी ; १२८ स्पर्धकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः सँटिनरी चेस क्लब गोवा आणि राजापूर रॉयल चेस अ‍ॅकडमी यांच्यावतीने (कै.) वसंत आठल्ये स्मृती चषक भव्य खुल्या बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेत गोवा, चिपळूण, रत्नागिरीसह अन्य विविध भागांमधील १२८ स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट करण्यासाठी पटावर डावपेच आखण्याच्या चालींनी स्पर्धेला रंगत आली होती.
पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर स्पर्धा संयोजक उद्योजक प्रकाश कातकर यांच्या हस्ते (कै.) वसंत आठल्ये यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला आरंभ झाला. या वेळी गोवा चेस असोसिएशनचे प्रेसिडेंट किशोर बांदेकर, इंटरनॅशनल आरबीटर संजय कवळेकर, अभिजित राय, पंचायत समितीचे माजी सभापती अभिजित तेली, लेखिका वृषाली आठल्ये, गजानन शेट्ये, कुंभार, सत्यवान कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राजापूरसारख्या ठिकाणी ही स्पर्धा होत असल्याबद्दल आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बांदेकर यांनी आनंद व्यक्त केला तर (कै.) वसंत आठल्ये हे बुद्धिबळपटू होते. त्यांच्या नावाने ही स्पर्धा घेण्यात आल्याने विशेष समाधान होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तर अभिजित तेली यांनी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केल्याने अनेकांना बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT