कोकण

राजापूर-राजापुरात महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार

CD

महाविकास आघाडीतर्फे
राजापुरात घरोघरी प्रचार

राजापूर, ता. ३० ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा शिवसेना, काँग्रेस यांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी शहरामध्ये प्रचारात गुंतले आहेत. घरोघरी जाऊन महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्यामुळे शहरामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरवात झाली आहे. राजकीय वातावरण निर्मितीसह आपल्या उमेदवाराची व्होटबँक वाढवण्यासाठी स्टार प्रचारक नेत्यांच्या जाहीर सभा आता सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांच्या प्रचारार्थ राजापूरमध्ये स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा झाल्या नसल्या तरी रत्नागिरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभा झाली. स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा होत असताना दुसऱ्या बाजूला पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर सध्या भर दिल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT