कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींवर प्रशासक

CD

जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींवर प्रशासक
मुदत संपली ; ग्रामस्थांमधूनही नाराजीचा सूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : लोकसभा निवडणुकीमुळे मुदत संपलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे प्रशासकांकडून वेळ मिळेल तेव्हा लक्ष दिले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे. वेळेत कामे होत नसल्यामुळे ग्रामस्थांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहेत.
जिल्ह्यात ६१ ग्रामपंचायतींची मुदत तीन महिन्यापूर्वीच संपुष्टात आली. लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू असल्यामुळे ग्रामविकास विभागातर्फे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. निवडणुका न झाल्याने आजच्या घडीला या ग्रामपंचायतींवर प्रभारी आहेत.
प्रशासक नेमलेल्या काही ग्रामपंचायतींचे कामकाज रामभरोसे सुरू असल्याची ओरड ग्रामस्थांमधून सुरू आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये तर प्रशासक आठवड्यातून दोनच दिवस येऊन जात आहेत. अशा परिस्थितीत लोकांची कामे कशी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. प्रशासक नसल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेऊन प्रशासकीय कारभार उठवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

चौकट
तालुका प्रशासक असलेल्या ग्रामपंचायती
* दापोली १०
* खेड ०२
* गुहागर ०९
* चिपळूण ०९
* संगमेश्वर ०४
* रत्नागिरी ०२
* लांजा ०३
* राजापूर ०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT