कोकण

क्राईम

CD

३४ ( पान ३ साठी, क्राईम )

दुचाकीच्या धडकेत
रिक्षाचालक जखमी

रत्नागिरी ः अल्पवयीन दुचाकीस्वाराने रिक्षाला धडक देऊन अपघात केला. या अपघातमध्ये रिक्षाचालक जखमी झाला. अल्पवयीन संशयित स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ एप्रिलला दुपारी मारूती मंदिर येथील नाट्यगृहासमोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन संशयित दुचाकी ही घेऊन जात असताना येथील नाट्यगृहासमोरील रस्त्यावर रिक्षाला धडक बसली. या अपघातामध्ये रिक्षाचालक तय्यब इस्माईल पटेल यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
-------------
रस्ता अडविणाऱ्यावर
कुडप येथे गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील कुडप देवशेतवाडी येथे रस्त्यावर दगड रचून मार्ग बंद करण्याचा प्रकार घडला. ही घटना ५ एप्रिलला घडली असून या प्रकरणी रविवारी (ता. २८) सावर्डे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नितीश केशव शिर्के असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कुडपच्या ग्रामसेविका स्वप्ना तुकाराम जाधव (३४, रा. सावर्डे नाभिकवाडी) यांनी दिली आहे. कुडप देवशेतवाडी ते दिबवी कातळ ग्रामपंचायत अंतर्गत २३ नंबरला नोंद असलेल्या रस्त्यावर ग्रामस्थांना अटकाव होईल, या पद्धतीने दगडाचा बांध रचून रस्ता वाहतुकीला बंद केला आहे. या रस्त्याबाबत गेल्या ३-४ वर्षापासून वादविवाद सुरू आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही याच्या तक्रारी झाल्या. न्यायालयात देखील हा वाद पोहोचला. आता रस्त्यावर दगडी बंधारा उभारल्याने नितीश शिर्के याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
--------------

गुढेत हातभट्टीवर कारवाई

चिपळूण : तालुक्यातील गुढे चांगतळवाडी येथे गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी ( ता. २९) रात्री १० वा. ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सुभाष शंकर उदेग (४७, गुढे चांगतळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुढे तळेवाडी येथील खासगी जागेत सुभाष उदेग याच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत गैरकायदा गावठी दारू काढून त्याची विक्री केली जात होती. या विषयी पोलिसांना माहिती मिळताच सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT