कोकण

‘महाज्योती’च्या २० जणांना मिळणार वैमानिक प्रशिक्षण

CD

‘महाज्योती’च्या २० जणांना
मिळणार वैमानिक प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेमार्फत नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूरसोबत ‘महाज्योती’च्या लाभार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२१ ला करार केला आहे. त्यानुसार २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीमार्फत विद्यार्थी व प्रशिक्षण शुल्क नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर उपलब्ध करून दिले आहे. सामंजस्य करारानुसार प्रशिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी ही नागपूर फ्लाईंग क्लब या संस्थेची आहे.
महाज्योतीच्या प्रशिक्षणात अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नसल्याबाबतची तक्रार सहभागी विद्यार्थ्यांनी २३ ऑक्टोबर २०२३ ला कार्यालयाकडे केली होती. याबाबत ३० ऑक्टोबर २०२३ ला नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूरचे सर्व संबंधित अधिकारी, महाज्योतीचे अधिकारी व विद्यार्थ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याबाबत व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे निवारण करण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले होते. याबाबत महाज्योतीच्या प्रशिक्षणार्थींनी १२ एप्रिल २०२३ ला प्रशिक्षण अभ्यासक्रम व विमान उड्डाण प्रात्यक्षिक विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांना सूचना देण्याबाबत कार्यालयास निवेदन दिले होते. याअनुषंगाने कार्यालयाने प्रशिक्षण कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचे पत्र व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांना दिले आहे. तसेच वरिष्ठांनाही याप्रकरणी उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत महाज्योतीने विनंती केली आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने महाज्योती संस्थेमार्फत आवश्यक सर्व पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT