कोकण

शिरवल रस्ता दुरूस्ती कामास अखेर सुरू

CD

kan21.jpg
80970
शिरवल : येथील रस्ता दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

शिरवल रस्ता दुरूस्ती
कामास अखेर सुरू
ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे
कणकवली, ता. २ : तालुक्‍यातील शिरवल गावातील मुख्य रस्ता दुरूस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे. रस्ता दुरूस्त होत नाही तोवर कुठल्‍याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी गावात प्रचारासाठी येऊ नये, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्‍यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
शिरवल गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे झाले नव्हते. यंदा या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही काम सुरू झाले नाही. त्‍यामुळे ग्रामस्थांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना गावात प्रचारासाठी येऊ नका अशी भूमिका घेतली. तशा आशयाचा फलक देखील गावच्या वेशीवर लावला होता.
या इशाऱ्यानंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता श्री. सुतार यांनी‌ आपल्या टीम सोबत येत शिरवल ग्रामस्थ आणि उपसरपंच प्रविण तांबे यांची भेट घेऊन रस्त्याची पाहणी केली. तसेच संबधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यासाठी सूचना केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT