कोकण

परुळे कोरजाईचा आज वर्धापन दिन

CD

परुळे कोरजाईचा
आज वर्धापन दिन
म्हापण : परुळे कोरजाई येथील श्री देवी कोरजाई-गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापन दिन उद्या (ता. ३) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता अभिषेक, त्यानंतर श्रींची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने आणि ७.३० वाजता दत्त माऊली दशावतार मंडळाचे नाटक, पहाटे काकड आरती होणार आहे.
.............
वेंगुर्लेत रविवारी
रक्तदान शिबिर
वेंगुर्लेः सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना सिंधुदुर्गतर्फे व वेंगुर्ला तालुका औषध कर्मचारी संघटनेच्या नियोजनाखाली रविवारी (ता. ५) येथील नगर वाचनालयात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रशांत मठकर किंवा आदित्य आजगावकर यांच्याशी संपर्क साधावा.
.............
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची
आज कुडाळला सभा
ओरोस : अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे उद्या (ता. ३) दुपारी १२ वाजता मांगल्य मंगल कार्यालय, वेताळ बांबर्डे (ता. कणकवली) येथे कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अॅड. संदीप निंबाळकर हे कामगार कायद्यातील बदल व त्याचे समाजावर परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजवादी नेत्या कमल परुळेकर, अंगणवाडीच्या नेत्या शालिनी तारकर यांनी केले आहे.
............
पेंडूर देव वेताळाचा
आज वर्धापन दिन
मालवणः पेंडूर येथील देव वेताळ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आज (ता. ३) साजरा होणार आहे. सकाळी ८ वाजता लघुरुद्र, दुपारी १२.३० ते २.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT