कोकण

ज्येष्ठ नागरिक संघाची सावंतवाडीत उद्या सभा

CD

ज्येष्ठ नागरिक संघाची
सावंतवाडीत उद्या सभा
सावंतवाडीः सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवारी (ता. ४) सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा-सावंतवाडी येथे आयोजित केली आहे, यावेळी ‘ज्येष्ठ नागरिक समस्या व समुपदेशन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
..........
चिपी-भरणीवाडी येथे
आज ‘प्रचंड मायाजाल’
म्हापणः चिपी-भरणीवाडी येथील देवी सातेरी देवस्थानचा सातवा वर्धापन दिन सोहळा ३ व ४ मे रोजी होणार आहे. यानिमित्त उद्या (ता. ३) सकाळी ८ वाजता पूजा अभिषेक, सायंकाळी ४ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळाचे (राठिवडे-सुतारवाडी) ''प्रचंड मायाजाल'' नाटक, शनिवारी (ता. ४) सकाळी ८ वाजता पूजा अभिषेक, ९ वाजता श्रींची महापूजा, ११ वाजता ढोलपथकाचा ढोल वादन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता आरती व नंतर महाप्रसाद, २ वाजता ऋतुजा पिळणकर (माणगाव) हिचे कीर्तन, सायंकाळी ४ वाजता कुलदेवता भजन मंडळाचे (विरणवडे-पेडणे गोवा) भजन, ६ वाजता देव कलेश्वर भजन मंडळा (नेरूर-कांडरीवाडी) चे भजन, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व १० वाजता दत्त माऊली दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
................
तरंदळेत सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
कणकवलीः तरंदळे येथील टेवणादेवी मंदिराचा वर्धापन दिन सोमवारी (ता. ६) टेवणादेवी मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, १०.३० वाजता श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री ११ वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडीचा प्रयोग सादर होईल. लाभ घेण्याचे आवाहन टेवणादेवी उत्सव कमिटीने केले आहे.
.............
मठ येथे १२ मे रोजी
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
वेंगुर्लेः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मठ-सिद्धार्थनगरतर्फे १२ मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ वर्षांखालील व १२ वर्षांवरील अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेतील लहान गटासाठी अनुक्रमे दोन हजार रुपये, दीड हजार रुपये व एक हजार रुपये, मोठ्या गटासाठी अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये अशी बक्षिसे ठेवली आहेत. नाव नोंदणीसाठी दत्तप्रसाद मठकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयेजकांनी केले आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT