कोकण

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम विजयी

CD

२३ (टूडे ३ साठी)

कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम विजयी

कुडावळे येथे आयोजन; बँक ऑफ बडोदा संघ उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २ : कुडावळे (ता. दापोली) येथे आयोजित राज्यस्तरीय (व्यावसायिक) कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम संघाने बँक ऑफ बडोदाचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला.
राज्य कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व दापोली तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने दापोली तालुक्यातील जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट भानघर आणि शनीदेव मित्रमंडळ कुडावळे (कादिवली) आयोजित राज्यस्तरीय (व्यावसायिक) भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियम विरुद्ध ठाणे महानगरपालिका या दोन संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना झाला. त्यामध्येच ठाणे महानगरपालिका संघाचा पराभव झाला तर दुसरा उपउपांत्यफेरीतील सामना सेंट्रल रेल्वे विरुद्ध बँक ऑफ बडोदा या दोन संघांमध्ये झाला. बँक ऑफ बडोदा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळेच अंतिम सामना भारत पेट्रोलियम विरुद्ध बँक ऑफ बडोदा या दोन्ही संघात अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या सामन्यात भारत पेट्रोलियम हा संघ विजयी झाला. या स्पर्धेत प्रो-कबड्डी स्पर्धेतील अनेक खेळाडूंनी भाग घेतला. चौथा क्रमांक सेंट्रल रेल्वे, तिसरा क्रमांक युनियन बँकेने पटकावला. वैयक्तीकमध्ये उत्कृष्ट चढाई जावेद शेख (ठाणे महानगरपालिका), उत्कृष्ट पकड आकाश अरसुळ (भारत पेट्रोलियम), सर्वोत्कृष्ट खेळाडू आकाश पिकलमुंडे यांचा गौरव करण्यात आला. शिस्तबद्ध संघ म्हणून मिडलाईन कर्जत या संघाला सन्मानित केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT